32.3 C
Nashik
Friday, April 10, 2026

दिंडोरीत अवैध धंद्यांवर प्रशासनाची कडक भूमिका

दिंडोरी प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर अखेर प्रशासनाने कडक भूमिका घेत प्रांताधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी थेट १५ दिवसांचा अल्टिमेटम देत सर्व विभागांना झटका दिला असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत नागरिकांच्या भावना ऐकून घेताना प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याची कबुली स्वतः प्रांताधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिली. त्याचवेळी आता सबब नाही, १५ दिवसांत निकाल हवा, असा स्पष्ट संदेश देत सर्व विभागप्रमुखांना कामाला लावले असून, पंधरा दिवसांत दिंडोरीत बदल दिसला पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा देत प्रांताधिकाऱ्यांनी प्रशासनाला अॅक्शन मोडमध्ये आणले. कामात कसूर करणाऱ्या विभागप्रमुखांची जबाबदारी निश्चित करून वरिष्ठ स्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला जाईल, असेही त्यांनी ठणकावले. दरम्यान, तालुक्यातील लॉजिंग व्यवसायावरही प्रशासनाची नजर वळली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लॉजिंगवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांना देण्यात आले आहेत.

प्रांताधिकारी डॉ. – आप्पासाहेब शिंदे यांनी घेतलेला हा धडाकेबाज आणि ठोस पुढाकार नागरिकांमध्ये आशा निर्माण करणारा ठरला आहे. लोकभावनांचा आदर करत थेट जबाबदारी निश्चित करण्याची भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाबद्दलचा विश्वास वाढताना दिसत आहे. अशा कर्तव्यदक्ष, निर्णयक्षम आणि अधिकाऱ्यांमुळेच लोकाभिमुख तालुक्यातील प्रश्नांना योग्य दिशा मिळू शकते, अशी सकारात्मक भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.– डॉ. आप्पासाहेब शिंदे, प्रांताधिकारी, दिंडोरी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles