सुरगाणा प्रतिनिधी
नायलॉन मांजा पर्यावरणास धोकादायक असून,नायलॉन मांजाचा वापर,विक्री साठा आणि वाहतूक करण्यास बंदी आहे, तसेच शहरात त्याची विक्री आणि वापर करू नये, नायलॉन मांजा पर्यावरणासाठी आणि सजीवांसाठी धोकादायक आहे, मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन सुरगाणा नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी केले आहे. नायलॉन मांजाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात विशेष पथक नेमण्यात आले आहे या पथकाकडून जनजागृती सह कारवाई केली जाणार आहेत. कोणीही प्रतिबंधित मांजाची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करणार नाही याची दक्षता ही पथके घेणार आहे. तसेच, नागरिकाना अहवान करणार येते की अशा प्रकारचे विक्री/वापर व साठा आढल्यास त्वरित नगरपंचायत कळवावे नायलॉन मांजाबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी सांगितले आहे.
