27.6 C
Nashik
Wednesday, July 15, 2026

गुटख्याच्या खरेदी विक्री च्या उलाढालीचे महाराष्ट्र गुजरात कनेक्शन?

अन्न व औषधं प्रशासन ऍकशन मोड मध्ये पोलीस केव्हा ऍक्टिव्ह होणार

नाशिक प्रतिनिधी

नाशिक, पेठ, वणी व दिंडोरी पोलीसांनी वेळोवेळी गुटखा तस्करांवर कारवाई करुनही काही कालावधीनंतर ही तस्करी पुन्हा सुरु होते    ठिकठिकाणी  गुटख्याची विक्री  होत असल्याने  एवढ्या धाडी पडुनही गुटखा व्यावसायिक  यांचे मनोबल व धैर्य अशा व्यवसायासाठी  वाढविणारांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचा सुर उमटतो आहे. महाराष्ट्र  व गुजरात अशा दोन राज्याच्या कनेक्शनच्या माध्यमातुन गुटखा व्यवसाय फोफावला असल्याच्या चर्चेने जोर पकडलाआहे .कोणताही अशा पद्धतीचा व्यवसाय करायचा म्हणजे  अनेकांना पुजावे लागते लक्ष्मी  दर्शनाचा प्रसाद दाखावावा लागतो तेव्हा कुठे प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते व सारे काही सुरळीत चालते
गुजरात राज्यात वापी येथे गुटखा तयार करण्याचा कारखाना असुन या ठिकाणाहुन बहुतांशी गुटखा नाशिक जिल्ह्यात येतो असे नाव न सांगण्याच्या अटीवर गोपनीय सुत्रांनी माहीती दिली. दिंडोरी पासुन 148 किलोमीटर वणी येथुन 145 किलोमीटर तर नाशिक येथुन 152 किलोमीटर अंतर गुजरात राज्यातील वापी शहराचे आहे. या ठिकाणाहुन महाराष्ट्रात  प्रवेश करताना येणारे  अनेक अडथळे पार पाडावे लागतात हे अडथळे कसे पार पाडुन ईच्छीत स्थळ गाठायचे व तेथुन माल साठवणुक कोठे करायची हे गणित अगोदरच ठरलेले असते त्यामुळे त्या गणिताच्या परिक्षेत नापास होण्याचा प्रश्नच राहत नाही होलसेलर्स रिटेलर्स तसेच उल्लेखनीय  असणारी विक्री  केन्द्रे याची माहीती खरेदिदार व विक्रेत्यांनाअसते त्यात डिलींगप्रमाणे कोडवर्डचा वापर करण्यात येतो तर भ्रमणध्वनीवरही मोजकेच तोलुनमापूनृ बोलले जाते हा सर्व व्यवहार अॕडव्हान्स किंवा ठरविलेल्या माध्यमातुन करण्यात येतो लेखाजोखा व द्राविडी प्राणायम एवढा सोपा नाही कारण त्यात रिस्क ही असतेच मात्र बडा रिस्क तगडा मुनाफा असेही गणित अशा व्यवसायाचे असते व सेटिंग आसली तर काही टेन्शन नाही अशी भुमिका व्यावसायिक  यांची असते अशी माहीती गोपनीय सुत्रांची आहे  विशेष बाब म्हणजे आजपर्यंत  स्थानिक पातळीवर गुटखा विक्रेत्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर हा गुटखा कोठुन आला ?गुटखा कोठे तयार केला जातो ? तो गुटखा ईथपर्यंत कसा आला ?  याची उत्तरे शोधुन गुटखा तयार करणार्यांवर कारवाई झाल्याचे एकही उदाहरण आजपर्यंत  आढळले नाही किंबहुना तशी कारवाईच झालेली आठवत नसल्याच्या  भुमिकेमुळे महाराष्ट्र  गुजरात कनेक्शनचा पर्दाफाश करण्यासाठी  यंत्रणेने रस दाखवला तर प्रतिबंधित गुटखा व्यवसायाला घरघर लागेल व नागरिकांचे आरोग्य शाश्वत राहील मात्र त्यासाठी असणारी ईच्छाशक्ती तेवढ्या तीव्रतेची असावी व वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचना तेवढ्याच महत्वाच्या आहेत यात शंकाच नाही.दरम्यान पोलीस अधिक्षक डॉक्टर स्वामी ,यांनी सुत्रे हाती घेतल्यापासुन गुटखा तस्करांवरील कारवाईला पुन्हा वेग अपेक्षित आहे गुटखा तस्करांची पाळेमुळे  खणुन काढण्यासाठी त्यांनी कारवाई साठी अग्रक्रम द्यावा तस्करांच्या मनात धडकी भरव्हावी भूतकाळात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु व गु टखा हा गुजरात राज्यातील वलसाड येथील नामोल्लेख असलेल्या पॕकिंग मधुन आल्याचे भूतकाळात पुढे आले होते भुतकाळातही पोलीसांनी या भागातील तस्करांवर कारवाई केली होती मात्र सोकावलेले गुटखा तस्कर वारंवार कारवाई होऊनही गुटख्याची तस्करी निर्ढावलेपणाने करतात हे एक प्रकारे आव्हान देण्याची त्यांची भुमिका असल्याचा सुर उमटत आहे दरम्यान गुटखा निर्माते ,तस्कर व विक्री करणारे यांचेवर मकोका सारख्या कडक कायद्याने कारवाई करण्यासाठी पाऊल टाकले मात्र त्याची गती का कमी झाली याचे उत्तर अदयाप अन्न व औषधं प्रशासन मंत्री यांचे कडून मिळणे अपेक्षित आहे.आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक डॉक्टर स्वामी यांनी अवैध व्यवसायाच्या समुळ उच्चाटणासाठी राबविलेली मोहीम कौतुकास पात्र आहे अवैध व्यवसाय उच्चाटनासाठी केलेली कारवाई कर्तव्यदक्षतेच्या कक्षेत बसत असुन इतरांसाठी ही प्रेरणादायी मोहीम असली तरी तत्सम अनुषांगिक सामुहीक प्रयत्न आवश्यक व गरजेचे आहे अन्न व औषध प्रशासन विभागानेही कारवाईस अग्रक्रम देणे गरजेचे आहे पोलीसांना गुटखा तस्करांवर कारवाईचे आधिकार प्राप्त झाल्याने बहुतांशी यावर बंधने आली आहेत मात्र चोरुन लपुन दुचाकी ,चारचाकी वाहनांच्या माध्यमातुन आशिर्वाद लाभलेल्या तस्करांची पाळेमुळे शोधणे अगत्याचे असल्याचा सुर उमटतो आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles