बागलाण:-प्रतिनिधी बिजोटे येथे आमदारांच्या हस्ते वीर एकलव्य पुतळ्याचे अनावरण…
सटाणा तालुक्यातील बिजोटे येथे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान एकलव्याच्या पुतळ्याचे अनावरण बागलाण तालुक्याचे आमदार श्री.दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रामाचे अध्यक्ष बिजोटे गावचे सरपंच पोपटराव जाधव होते .ह्या कार्यक्रमाला तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते..वीर एकलव्याची ही एक योध्दयाची कथा नसून ती स्वाभिमान, निष्ठा व शिक्षणासाठीची तळमळ यांचा संदेश देणारी ही एक प्रेरणादायी गाथा आहे.असे आदिवासी बांधवांना संबोधित करताना आमदारांनी सांगितले..
