27.6 C
Nashik
Wednesday, July 15, 2026

अनैतिक संबंधातून प्रेयसीचा खून; पसार ‘गोपी’ कर्नाटकात जेरबंद; २४ तासात ४ राज्ये पालथी घालत लावला छडा

आडगाव-उपनगर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन; कल्याण, रत्नागिरी, गोवा, कर्नाटकपर्यंत पाठलाग करून मंगळुरू न्यायालयातून घेतला ट्रान्झिट रिमांड

नाशिक/प्रतिनिधी:- अनैतिक प्रेमसंबंधातून प्रेयसी सुनिता विश्वकर्मा हिचा खून करून फरार झालेल्या प्रियकराला नाशिक पोलिसांनी थेट कर्नाटकच्या मंगळुरूमधून मुसक्या आवळून आणले. गोपीनाथ उर्फ गोपी रवींद्र गोसावी, वय ३३, रा. राहुल नगर, उपनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आडगाव व उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने २४ तास अहोरात्र पाठलाग करत ही धडाकेबाज कारवाई केली.

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. गुन्हा दाखल करून आडगाव पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याचे पो.अं. मिलिंद बागुल यांना गोपनीय माहिती मिळाली: मयत महिला सुनिता विश्वकर्मा असून तिचा प्रियकर गोपी गोसावी याने अनैतिक संबंधातून तिचा खून करून पळ काढला आहे. माहिती मिळताच उपनगरचे वपोनि जयंत शिरसाठ यांनी तत्काळ पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त-१, पोलीस उप आयुक्त-२, सहा. आयुक्त यांचे मार्गदर्शन घेतले. आडगावचे वपोनि संजय पिसे यांच्याशी समन्वय साधून दोन्ही ठाण्यांचे संयुक्त पथक तयार केले.

उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोउपनि प्रभाकर सोनवणे, पोहवा संदीप पवार, पोशि पंकज कर्पे, आडगावचे पोहवा वाघ, इम्रान शेख यांचे पथक खाजगी वाहनाने रवाना झाले. तर पोहवा विनोद लखन, पोअं मिलिंद बागुल, जयंत शिंदे यांच्यावर आरोपीची संपूर्ण माहिती काढण्याची जबाबदारी सोपवली. तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्य वापरून पथकाने कल्याण, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक असा २४ तास अहोरात्र पाठलाग केला. अखेर मंगळुरू, कर्नाटक येथे आरोपी गोपी गोसावी सापडला. संशयित आरोपी गोपी गोसावी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सुनिताचा खून केल्याची कबुली दिली. पथकाने त्याला मंगळुरू न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतला आणि आडगाव पोलीस ठाण्यात आणले. अशा प्रकारे अनोळखी मयत महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला. एका ठाण्याला मिळालेली माहिती, दुसऱ्या ठाण्यातील गुन्हा आणि दोन्ही पथकांचा समन्वय यामुळे आरोपी २४ तासांत गजाआड झाला. या कारवाईने आंतरराज्य पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून दिले. पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles