30.5 C
Nashik
Saturday, May 30, 2026

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. डी. एस. स्वामी

नाशिक प्रतिनिधी

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षकपदी आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे डॉ. डी. एस. स्वामी यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षकांचा समावेश आहे. कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना शक्यतो प्रमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या टाळल्या जातात. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षकपद मात्र त्यास अपवाद राहिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होत आहे. अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे अझीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांची नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. स्वामी यांनी नाशिक शहर पोलीस दलात उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त म्हणून नाशिकमध्ये काम करताना डॉ. स्वामी यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. नाशिकमधील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्या धडक कारवाईतून गुन्हेगारीला राजकीय पाठबळ देणारी नेतेमंडळीही सुटली नव्हती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles