दोन मुलांसह वडीलांचा मृतदेह सापडला, एक बालकाचा शोध सुरू
निफाड प्रतिनिधी
रानवडमध्ये राहणार्या एका मुजराने पत्नीबरोबर किरकोळ वाद झाल्यानंतर तीन मुलांसह पालखेड डाव्या कालव्यात उडी घेत आत्महत्या केली. यात चौघाचाही मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शोध घेतला असता, दोन बालक आणि वडिलांचा मृतदेह आढळला आणि तर दीड वर्षाच्या मुलाचा शोध रात्री उशीरापर्यंत घेण्यात येत होत. दीपक पोपट पवार(वडील), मुले वीर दीपक पवार(५), प्रसाद दीपक पवार(३) अविनाश दीपक पवार (दीड वर्ष) असे मयत झालेल्याचे नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रानवड येथील दीपक पोपट पवार (वय ३०) यांनी पत्नीबरोबर वाद झाल्यानंतर आपल्या तीन मुलांसह घरातून बाहेर पडत मुलांना केस कटिंगला घेऊन जात आहे, असे सांगितले. त्याने थेट पालखेड डाव्या कालव्याची चारी क्रमाक दहा गाठली. त्याने अगोदर दोन मुलांना पाटात फेकले आणि दीड वर्षाच्या मुलाला स्वतःजवळ छातीला धरून पाण्यात उडी घेतली. हे दृष्य आजूबाजुच्या लोकांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड करून बचाव कार्य करण्याचे केले. मात्र तो पर्यंत आगोदरदोन मुलांचा नाकतोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला होता. तर दीपक याच्याही मृत्यू झाला होता. त्याच्या सोबत असलेला दीड वर्षाचा मुलगा हे सापडत नव्हते. पोलिसांनी तात्काळ पाटबंधारे अधिकार्यांना कळवून पाणी बंद करण्याचे सांगितले. पाणी कमी झाल्यानंतर दीपक पवार याचा मृतदेह सापडला तर त्याच्या जवळ असलेला दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाण्यात वाहून गेला. रात्री उशीरापर्यंत मृतदेह आढळत नसल्याने पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुरू असलेले शोधकार्य थांबवले. या प्रकरणी रात्री पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दीपक, त्यांची पत्नी पूजा आणि भाऊ राहुल हे तिघेही सात वर्षांपासून शिवप्रसाद वाघा वायनरी येथे काम करत होते. मात्र घटनेच्या दिवशी त्यांच्यात काहीतरी कारणावरूनवाद झाल्याची चर्चा परिसरात होती. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांकडून सुरू आहे.