Home नाशिक विंचुरी दळवी येथे धारदार हत्याराने वार करुन 50 वर्षीय इसमाचा खून

विंचुरी दळवी येथे धारदार हत्याराने वार करुन 50 वर्षीय इसमाचा खून

0

नाशिक प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी गावात भैरवनाथ मंदिराजवळ एका 50 वर्षीय पुरुषाचा निर्घण खून झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार (दि.4) रोजी मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान घडली असून, अज्ञात व्यक्तीने मयताच्या चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे वृत समोर आले आहे. मयत व्यक्तीचे नाव विलास आबाजी दळवी (उर्फ बजरंग, वय 50) असे आहे. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version