Home Uncategorized मारहाण व बदनामीमुळे हिंदू धनगर अल्पवयीन मुलाची आत्महत्या

मारहाण व बदनामीमुळे हिंदू धनगर अल्पवयीन मुलाची आत्महत्या

0

खंडणी मागितल्याचा व पोलिसांनी मारहाण केल्याचे कलम लावले नसल्याचा आरोप !

नानासाहेब लोखंडे/ शिर्डी :-
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावातील हिंदू- धनगर समाजातील अनिकेत सोमनाथ वडीतके (वय १७) या अल्पवयीन मुलाची कोल्हार- राजुरी रोडवर तीनचारी जवळ टाटा एस वाहन अडवले, कथित गोरक्षकांनी खंडणी मागितल्याचा आरोप मयत अनिकेतच्या कुटुंबीयांनी एका चित्रफितद्वारे केला आहे. अनिकेत याने आरोपींना खंडणी न दिल्याने त्यास जबर मारहाण करण्यात आली, त्यानंतर दिनेश राकेचा याने अल्पवयीन अनिकेत याची ओळख प्रसीध्द करण्यासाठी त्याचा फोटा व बदनामीकारक मजकुर, अपमानास्पद स्टोरी इंस्टाग्राम व व्हॉटसअपवर टाकल्याचे व त्या स्टोरीमध्ये टाकल्याचे दिसुन आले आहे. तसेच दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खर्डे, सौरभ लहामगे, व इतर यांनी अनिकेत यास शिवीगाळ करुन धमकी दिली होती. त्यामुळेच अनिकेत याने दि. २८/१०/२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्यापूर्वी राहाते घरातील अँगलला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. याबाबत अमोल मोहन वडीतके याने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खर्डे, सौरभ लहामगे व इतर सर्व रा. कोल्हार ता. राहाता यांचे विरुध्द लोणी पोलीस स्टेशन येथे गुरनं.५८२/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०७, ३५१(२), सह अल्पवयीन अनिकेतची ओळख उघड केल्याने बाल न्याय कायदा २०१५ चे कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई संजय विखे करीत आहे.
काल (दि. २८) रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास लोणी पोलीस स्टेशनच्या आवारात संतप्त नातेवाईकांनी कथित गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत अनिकेतचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याचा आरोप केला होता तसेच पोलिसांनी अनिकेत यास मारहाण झाल्याचे कलम लावले नसल्याचा देखील आरोप होत आहे. त्यामुळे अनिकेतला मारहाण झाली होती अथवा नाही हे शोधण्यासाठी त्याच्या अवयवाचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून आरोपींवर जबर मारहाणीचे व खंडणी मागितल्याचे वाढीव कलम लावण्याची मागणी होत आहे.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार :-
कथित गोरक्षकांनी मारहाण करुन बदनामी केल्याने अनिकेत सोमनाथ वडीतके या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले आहेत. तर इतर म्हणून फिर्याद मध्ये नोंद करण्यात आलेले आरोपी नेमके किती व कोण ? याचा शोध लागेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अज्ञात आरोपींचा शोध लागत नाही :-
मागील दोन वर्षात लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील अज्ञात किंवा इतर आरोपींची संख्या निश्चित होऊन आरोपींचा शोध लागलेला नाही. त्याप्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी देखील कायमचे अज्ञात म्हणून राजरोस समाजात फिरतील का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

श्रीरामपूरचा ‘तो’ पदाधिकारी कोण ?
घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद नोंदवू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना श्रीरामपूर येथून एका सत्ताधारी पक्षाचा जिल्हाअध्यक्ष वारंवार कॉल करुन दबाव आणत होता, अशी चर्चा होती. हि बाब माध्यमात आल्याने पोलिसांवर दबाव आणणारा पदाधिकारी नेमका कोण आहे ? याबाबत दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सखोल चौकशी करुन कॉल करुन पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणलेप्रकरणी गुन्हा दाखल करतील का ? हा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version