Home Uncategorized परतीच्या पाऊसामुळे शेत पिकांना मोठा फटका. अति पावसामुळे पिकाची खराब

परतीच्या पाऊसामुळे शेत पिकांना मोठा फटका. अति पावसामुळे पिकाची खराब

0

कळवण प्रतिनिधी

अवकाळी पाऊसाने सुरुवात केल्याने शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होणाऱ्या पाऊसाने काढणीला आलेला मका ,मका सोयाबीन बाजरी कांदा रोपे भाजीपाला नुकसान झाले आहे तसेच कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले आहे.अचानक सुरु झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे, दुष्काळात तेरावा महिना म्हाणावा लागेल अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे, आधीच दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या शेतकऱ्याने कसेबसे पिके जगवत पिकांना जीवनदान दिले होते. अगदी हातातोंडाशी आलेला निर्सगाने हिसवून घेतला आहे, पिके वाया जाण्याच्या परिस्थिती आहे ,पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे,कर्जाच्या खाईत डूबलेल्या शेतकरी वर्गाला किमान ह्या पिकाकडून आशा होती परंतु बेमोसमी पावसाने केलेलं अतोनात नुकसान शेतकरी देशोधडीला लागल आहे. कळवण तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे कांदा रोप व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . सतत होणाऱ्या पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .उन्हाळी कांदा बियाणे शेतकऱ्यांनी टाकले मात्र पावसाने नुकसान केल्याने पुन्हा खराब झाले शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे .काढणीला आलेला मका भात उडीद पावसामुळे खराब होण्यास सुरुवात झाली आहे .पाऊस उघडत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे .शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी उन्हाळी कांदा बियाणे शेतामध्ये टाकण्यात आले होते मात्र पावसाने कांदा रोपाचे नुकसान झाले आहे.पहिले कांदा रोप खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version