Home नाशिक जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत. माजी विद्यार्थीं स्नेह मेळावा...

जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत. माजी विद्यार्थीं स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

0

कळवण प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत माजी विद्यार्थी संवाद मिळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात घेण्यात आले मा. सीईओ साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या कल्पनेतून “माझी शाळा माझा अभिमान”. उपक्रमाचे आयोजन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरू आहे या अनुषंगाने पिंपळे खुर्द गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळेत शाळेचे मुख्याध्यापक भानसी सर व सर्व शिक्षक,शिक्षिका स्टाफ यांच्याकडुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माझ गाव माझी शाळा उपक्रम राबवत आजी माजी विद्यार्थी स्नेह संमेलन मेळावा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला कारण हा माजी विद्यार्थी मेळावा आपुलकीचा. स्नेहाचा. ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचा. भेटीगाठीचा व्हावा. जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता मोठ्या उत्साहाने आयोजित केले होते. यावेळी माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात येताच शाळेचा परिसर फुलून दिसत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भानशी सर यांनी व शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी यांनी देखील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथबाबा बहिरम हे होते तर प्रमुख पाहुणे येशीनाथ बागुल हे होते व शिक्षण प्रेमी कैलास दादा बहिरम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम व सर्व शालेय समिती सदस्य उपस्थित होते
यावेळी आजी-माजी संरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वरिष्ठ भजनी मंडळी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजन करत कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली होती व यावेळी सर्व उपस्थित मान्यवर माजी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सत्कार सन्मान करण्यात आले होते. व यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाच्य हसू व हाव भाव फुलून दिसत होते व त्यातच देखील शाळेचे परिसर देखील फुलून दिसत होते. यावेळी माजी विध्यार्थ्यांनी जे या शोळेतुन शिकुन डॉक्टर, पोलीस, वकिल, शिक्षक, समाजसेवक, शेतकरी, पञकार,ग्रामसेवक व ईतर क्षेञात नोकरीला असलेले माजी विद्यार्थींनी बोलतांना आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना ऊजाळा दिला व मला घडवणारी माझी शाळा हा माझा अभिमान आहे. या शाळेमुळेच आपण प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी झालो आहोत म्हणून या आधुनिकतेच्या व खाजगी शाळांमुळे कुठेतरी दुर्लक्षित होत आहे सर्वांचे भविष्य घडवणारी शाळा ही सदैव टिकली पाहिजे. या डिजिटल युगात आपल्या शाळेला कशाची कमी आहे व काय नविन करता येईल, शालीय शिक्षणासाठी कशाची पण मदत लागो आम्ही कायम तत्पर राहु अशी सर्व माजी विद्यार्थ्यांनी गवाई दिली व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी सुंदर असे आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी संरपंच,सदस्य,शालेयी समीती अध्यक्ष, पेसा अध्यक्ष, सदस्य व सर्व माजी विद्यार्थीं व गावातील जेष्ठ नागरिक, शिक्षक,शिक्षिका स्टाफ उपस्थित राहुन कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा झाला…

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version