Home धार्मिक गल्ली ते दिल्ली ते दक्षिण भारत शांती संदेश देत वारकरी केरळ कडे...

गल्ली ते दिल्ली ते दक्षिण भारत शांती संदेश देत वारकरी केरळ कडे रवाना

0

देवळा प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील खामखेड़ा येथील वारकरी,शेतकरी, मंडळ गल्ली ते दिल्ली ते दक्षिण भारत पर्यंत शांती संदेश अभियान घेऊन आज केरळ कडे रवाना झाले. या गल्ली ते दिल्ली शांती संदेश अभियानात झाडे,पाणी,लेक देश, संस्कृती,धर्म,गोमाता वाचवा तर भ्रष्टाचार, दहशतवाद, भ्रूणहत्या,वृद्धाश्रम,व्यसन हटवा आणि स्वच्छ भारत,सुंदर भारत,प्रदुषण मुक्त भारत,दिवसेंदिवस तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे .त्यापासून सावध राहावे, मोबाईलचा वाढत जाणारा अतिवापर कमी करावा असे विविध प्रकारचे संदेश घेऊन वारकरी मंडळ गल्ली पासून ते दिल्ली , कन्याकुमारी पर्यन्त जात असतांना वाटेत लागणाऱ्या छोट्या मोठ्या गावांमधे टाळ-मृदुंग वाजवित हे संदेश समाजापर्यंत पोहचविणार आहेत. आज वारकरी शांती संदेश अभियान घेऊन जात असताना त्यांचे खामखेडा चौफुली जवळ ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.देवळा येथे पाचकंदील जवळ पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी शांती संदेश अभियानचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.ग्रामपंचायतीच्या वतीने गुलाबपुष्प देऊन वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला या संदेश अभियानाची सुरुवात खामखेड़ा येथूनच करण्यात आली.सकाळी वारकऱ्यांनी टाळ-मृदुंग वाजवित गावातून प्रभात फेरी काढली. या संदेश अभियानात वारकरी शेतकरी मंडळ श्री स्वामी समर्थ यात्रा कंपनी चे संचालक
ह भ प किशोर अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली
शिरोरे प्रतिष्ठान च्या विद्यमाने वारकरी.महेश शिरोरे दादाजी बोरसे. आदि वारकऱ्यांचा समावेश आहेत औंढानागनाथ येथिल मंदिर समितिच्या वतीने अभियानाचे स्वागत करण्यात आले असुन, पुजारी अभिजीत औढ़ेकर हे शांती संदेश अभियान दिल्ली ,ओडिशा आणि आता दक्षिण भारत कन्याकुमारी पर्यंत जात असताना प्रत्येक जागेवर विशेष अशा विशेष सन्मान करुन केरळ येथील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रामेश्वरम् येथील मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते जनजागृती अभियानाचा समारोप करणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version