0

बाऱ्हे परिसरात 100 कुटंबाना घरघंटी वाटप करून दिवाळी महोत्सव साजरा

 

खोकरविहीर:-
आंबोडे,बेडसे, कळमने ग्रामपंचायत मध्ये दिवाळी बंपर ऑफर घर घंटी वाटप करून दिवाळी महोत्सव स्थानिक परिसरातील बेडसे माजी सरपंच संजय पडेर, झगडपाडा नामदेव पाडवी, खिरमाणी येथील डॉ. सुभाष चौधरी, खोकरविहीर येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम महाले, अंबुपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते योगीराज वाघमारे यांच्या प्रयत्ननातुन बाऱ्हे, आंबोडे, झगडपाडा, बेडसे, खडकी, खोकरविहीर अशा अनेक गावांना 100 घरघंटी (पिठ गिरणी) बाजारात रु. 15000/- भेटणारी गिरणी सामाजिक कार्यकर्ते यांनी रु. 7600/-रुपयात उपलब्ध करून दिल्याने स्थानिक परिसरात दिवाळी साजरी झाली. परिसरात स्थानिक जनतेने तसेच लाभार्थी यांनी आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला.या घरगुती घरघंटी. मुळे स्थानिक कुटुंबालाची वेळीची बचत होणार असून या घर घंटी मुळे गहू, बाजरी, हरभरा, डाळ, ज्वारी, तादुळ इत्यादी पासून पीठ तयार होणार असून दूरवर न जाता आपल्याच घरात दळण तयार होऊन वेळेची बचत होणार आहे.
लाभार्थ्यांना घरघंटी वाटप केल्याने कमी दरात उपलब्ध करून दिल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय पडेर साहेब, नामदेव पाडवी यांचा मोलाचा वाटा असून गावोगावी स्थानिक कार्यकर्ते संपर्क ठेवून स्थानिक लाभार्थी यांनी घरघंटी रु.7600 मध्ये भेटणार आहे म्हणून जनजागृती करण्यात आली यासाठी योगीराज वाघमारे, डॉ. सुभाष चौधरी, शांताराम महाले, शांताराम जाधव, उत्तम घांगळे , जनार्धन बारे, कैलास चौधरी, अशोक जाधव, सखाराम भोंढवे, गणेश घांगळे , हिरामण महाले, रघुनाथ घांगळे, शांतीलाल अलबाड, प्रकाश धूम, युवराज लोखंडे, जनार्धन खुरकुटे आंबे पाडा उपसरपंच, सुनिल बारे, पुंडलिक पाडवी इत्यादी कार्यकर्ते यांनी स्थानिक लाभार्थी यांनी गावागावात जाऊन संपर्क करून पीठ गिरणी बाबत महत्व पटवून देण्याचे काम केले. यापुढील स्थानिक गावांना जनसुविधा उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय कार्यकर्ते यांनी ठेवले आहे. संजय पडेर, नामदेव पाडवी यांनी स्थानिक लोकांना आवाहन केले असून जास्तीसजास्त लोकांनी या सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे.संजय पडेर यांनी सांगितले की, आदिवासी समाजाची कुठल्याही प्रकारची फसवणूक न करता जनतेला आवडणारी आणि परवडणारी अशी घरघंटी आम्ही देत आहोत लाभार्थी आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत 100 वाटप झाल्या परत बुकिंग चालू आहे.
गिरणी वाटप झाल्याने स्थानिक जनतेने याचे अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version