Home Uncategorized चिंचपाडा (श्रीभुवन) येथे आयडियाजम संस्थेचा तर्फे दिवाळी महोत्सव साजरा

चिंचपाडा (श्रीभुवन) येथे आयडियाजम संस्थेचा तर्फे दिवाळी महोत्सव साजरा

0

खोकरविहीर प्रतिनिधी

“प्रकाशाचा सण, आनंदाचा नवा क्षण” हे ब्रीद घेऊन आयडियाझम सामाजिक संस्था, नाशिक आणि मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्तिक आयोजनाने चिंचपाडा (श्रीभुवन) पाड्यात दिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवामध्ये प्रथमतः संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांनी गाव स्वच्छता केली. रांगोळी, फुल माळा, लाईट, आकाश कंदील, फुग्यांनी सर्व गावाची सजावट केली. गावातील प्रत्येक महिलेला दिवाळी भेट म्हणून चार्जिंग टॉर्च, दिवाळी किराणा (प्रति १ किलो साखर, रवा, मैदा, बेसन, तेल), पणत्या, फराळ, राजगिरा लाडू या वस्तूंचे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी दप्तर, लेखन पॅड, पाणी बॉटल, वह्या, अंकलिपी तसेच इतर शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. साहित्य वाटपानंतर गावातील लहान मुलांसोबत फटाके फोडत दिवाळी साजरी केली, ज्यामुळे या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. महोत्सवाचा शेवटी गावातील विविध आदिवासी काळापथकांनी आपली नृत्यकला सादर करून केला. यात ढोल पावरी, ठाकऱ्या नृत्य, टिपरी नृत्य, डोंगर देव नृत्य अशा विविध कला या पथकांनी सादर करून पाहुण्यांना आनंदित केले. या नृत्यकला आणि त्यातील वाद्ये यांची संपूर्ण माहिती कलाकारांनी उपस्थितांना दिली. या दिवाळी महोत्सवामुळे सर्व गाव एकत्र आले. सर्वांनी मोठ्या आनंदाने या महोत्सवात सहभाग घेत दिवाळी साजरी केली.दिवाळी महोत्सव संकल्पना उद्देश, आयडियाझम संस्थेचे सर्व काम आणि प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष नारायण गभाले यांनी आपले मत मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निधी देणाऱ्या दात्यांचे आणि नियोजनात सहभागी सर्व गावकरी व स्वयंसेवक यांचे त्यांनी विशेष आभार मानले. दिवाळी महोत्सवासाठी समाजकार्य महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, संस्थेचे संकेत बिडगर, संतोष बोंबले, अजय हांडे यांनी विशेष सहकार्य केले. अनुराधा सिंग, अनुज देवरे, प्रा. निकिता कुवर, आदित्य राजपूत तसेच संस्थेचे इतर सदस्य व समाजकार्य महाविद्यालयाचे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. गावातील यशवंत बंगाळ, भाऊराव बंगाळ, काशिराम चौधरी, चिंतामण राऊत, पोपट भोये, मुरलीधर भोये, मुरलीधर कोल्हे, जिवाला बंगाळ, चंदर बंगाळ, विठ्ठल महाले, गोपाळ ठाकरे, लक्ष्मण बंगाळ यांनी गावातील कार्यक्रमाचे नियोजन केले.यावेळी चिंचपाडा ग्रामस्थ महिला, पुरुष कलाकार, विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित राहून दिवाळी महोत्सव साजरा केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version