Home Uncategorized घाणीचापाड्यात सारजी संस्थेचा दिवाळी महोत्सव साजरा

घाणीचापाड्यात सारजी संस्थेचा दिवाळी महोत्सव साजरा

0

बोल बिनधास्त खोकरविहीर

दिवाळीनिमित्त सारजी बहुउद्देशीय संस्था नाशिकरोड यांच्या वतीने सुरगण्यातील आदिवासी घाणीचापाड्यावर संस्थेच्या वतीने दिवाळी महोत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तेथील रहिवाशांना गरजेच्या वस्तू राशन (रवा, मैदा, साखर, तेल, बेसन) व दिवाळी गोड होण्यासाठी फराळाचे वाटप केले तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप, गावातील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल अशी भेटवस्तू म्हणून सौरऊर्जेवर चालणारा दिवा (सोलर लॅम्प) देण्यात आला यामुळे पाड्यावरील नागरिकांची दिवाळी प्रकाशमय झाली. घाणीचापाड्यात सर्व गावात आनंदाचे वातावरण पावरी नृत्य वाजवून संस्था आणि ग्रामस्थ यांनी दिवाळी उत्सव साजरा केला दिवाळी महोत्सव उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी प्रशांत रोकडे, सुशांत भोसले, राहुल साळवे, सागर पगारे, अरविंद साळवे, गौरव ओहोळ, अभिषेक शिंदे, तुषार साळवे, सौरभ साळवे, गोविंद गवळी, सार्थक गवारे आदी उपस्थित होते यावेळी घाणीचा पाडा सर्व ग्रामस्थ लहान थोर उपस्थित राहून आनंदामय दिवाळी साजरी करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version